breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘क्लीन सिटी’ असलेल्या पिंपरी-चिंचवडची यंदा स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिछाडी

  • स्वच्छ व सुंदर पिंपरी-चिंचवड शहर सांगण्यापुरतेच राहिले
  •  देशात गतवर्षींच्या 43 व्या स्थानावरुन यंदा 52 स्थानी पिछाडीवर 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात यंदा पिंपरी चिंचवड शहराची गच्छंती झाली आहे. शहराला गतवर्षींच्या 43 व्या क्रमांकावरुन यावेळेस 52 वे “रॅंकिंग’ तर राज्यात 13 वा क्रमांक मिळाला आहे. शहराला ‘पाणंदमुक्त शहर’ वगळता स्वच्छताविषयक अन्य कामात ठोस कामगिरी महापालिकेला करता आलेली नाही. ‘स्वच्छ व सुंदर शहर’ हे केवळ सांगण्यापुरते असून प्रत्यक्षात परिस्थिती विदारक आहे.  

काही वर्षापुर्वी देशभरातील ६५ शहरांतून ‘बेस्ट सिटी’ म्हणून आणि राज्यातील ‘क्लीन सिटी’ म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा गौरव झाला होता. भाजप सरकारने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले. अनेक संस्था, संघटना सहभागी झाल्या. या कामात महापौर, आयुक्त यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, राजकीय पक्षही या मोहिमेत उतरले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शहरात ‘स्वच्छतेचा महाउत्सव’ सुरु झाला.

केंद्र शासनाने ‘स्वच्छ भारत अभियान’ घोषित केले, त्याच धर्तीवर राज्यातही ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ सुरू झाले. त्याचाच कित्ता गिरवत पिंपरी पालिकेने ‘स्वच्छ व सुंदर’ शहराची मोहीम सुरू केली. मागील तीन वर्षांत स्वच्छतेचा मुद्दा डोळय़ांसमोर ठेवून महापालिकेने अनेक उपक्रम राबवले. त्याचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही. कारण, आजही स्वच्छतेच्या नावाने शहरभर ओरड कायम आहे. स्वच्छतेच्या विषयावरून नागरिक समाधानी नाहीत. नगरसेवकच सातत्याने तक्रारी करत आहेत. आमदार अधिकाऱ्यांना फैलावर घेत आहेत. कचऱ्याचे ढीग साचलेले नाहीत की कचराकुंडय़ा ओसंडून वाहत नाहीत, असा शहरातील एकही भाग नाही.

2016 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहर देशात नवव्या क्रमांकवर, तर राज्यात पहिल्या क्रमांकवर होते. तर, 2017 मध्ये घसरण होऊन 9 व्या क्रमांकावरुन शहर 72 व्या नंबरवर फेकले गेले होते. पिंपरी-चिंचवड शहरात 4 जानेवारी 2019 पासून महिनाभर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. त्यावर महापालिकेने 18 लाख रुपये खर्च जनजागृती केले होता. शहरातील नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे 45 हजार स्वच्छता अॅप डाऊनलोड केले.

दरम्यान, सन 2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी चिंचवड शहराचा 9 वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून 1 नंबर आला होता. पंरतु, 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर जावून थेट 72 व्या नंबरवर फेकले गेले होते. गतवर्षीच्या 2018 मध्ये पिंपरी चिंचवड शहराची 43 व्या स्थानावर घसरण झाली. परंतू, स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहर टॉप-10 मध्ये येईल, असा आत्मविश्वास आयुक्तांसह पदाधिका-यांना होता. मात्र, यंदा स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत देशात शहर 53 व्या स्थानावर आल्याने स्वच्छ व सुंदर शहर हे सांगण्यापुरतेच झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button