breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्राधिकरणाच्या विकसित भागाबरोबर अविकसित भागही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वर्ग करा

महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती .

पिंपरी | प्रतिनिधी

शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या व औद्योगीकरण याचा विचार करुन शहराचे सुयोग्य नियोजन होणे गरजेचे आहे. विकास कामात उद्भवनाऱ्या अडचणी वेळीच दुर करण्यासाठी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) विकसित भागाबरोबर अविकसित असलेला भागही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वर्ग करणेत यावा, अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे हि मागणी केली असल्याची माहिती माई ढोरे यांनी दिली.

ते म्हणाले , परी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) विकसित असलेला भाग हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर अविकसित असलेला भाग हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए) हद्दीत समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली असल्याबाबतची माहिती वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्द झाली आहे.

खरंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अगोदरच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ (एमआयडीसी) या तीन संस्था कार्यरत आहेत. सद्यस्थितीत या संस्थामार्फत शहरामध्ये रस्ते विकसन, निवासी, बिगरनिवासी व औद्योगिक इमारतींना बांधकाम परवानगी देणे, पाणीपुरवठा करणे व शहराचा मुलभूत विकास करणे, इ. विकासकामे केली जातात. या तीन वेगवेगळ्या संस्थाचे शहराच्या विकासकामावर वेगवेगळे नियंत्रण असल्याने विकास कामांबाबत कोणताही निर्णय घेत असताना वेळोवेळी अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत असतात. आता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) अविकसित असलेला भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचेकडे विकसनासाठी दिल्यास शहराच्या विकास कामांमध्ये आणखी चौथी संस्था निर्माण होईल व त्यामुळे अडचणीमध्ये आणखी भर पडु शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button