breaking-newsराष्ट्रिय

महिला पोलिसाने चौकीत केला डान्स, टिकटॉक व्हिडीओ व्हायरल

अहमदाबाद – गुजरातमधील एका महिला पोलिसाचा चौकीत डान्स करतानाचा टीकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अर्पिता चौधरी असे त्या महिला पोलिसाचे नाव असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला निलंबीत करण्यात आले आहे.

अर्पिता चौधरी या लोक रक्षक दलातील पोलीस अधिकारी आहेत. त्या मेहसाना जिल्ह्यातील लांघनाज पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना त्यांनी तेथे डान्स करत एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना नोकरीवरून निलंबीत करण्यात आले आहे. ‘चौधरी यांनी नियमांचा भंग केला आहे. ड्युटीवर असताना त्यांनी गणवेष घातला नव्हता. त्यात त्यांनी पोलीस ठाण्यातच त्यांचा टिकटॉक व्हिडीओ रेकॉर्ड केला. पोलीस ठाण्यात शिस्त पाळणे हे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे’, असे पोलीस उपाधिक्षक मंजिथा वंझारा यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button