TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

हॅक फॉर अर्थ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या विद्यार्थ्याचे यश

पिंपरी | प्रतिनिधी

स्विडीश सरकारने आयोजित केलेल्या 121 देश सहभागी झालेल्या हॅक फॉर अर्थ स्पर्धेत पाणी विभागात पुणे येथील एआयएसएसएम अंभियांत्रिकी विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार खोत याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.या स्पर्धेत 1,370 संघ सहभागी झाले होते. या यशाने ओंकार खोत हा वरुण ब्लू टिमचा टिम लिडर म्हणून उदयास आला आहे. ऑनलाइन हॅकाथॉन 2 आठवडे शोधण्यावर भर दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 17 शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ अभियांत्रिकी विज्ञान आणि युवा अशा मान्यवर संस्थाचे पाठबळ लाभले.

वरुण ब्लू विजेत्या संघात ओंकार खोत-टीम लीडर (भारत), गौरी यांचा समावेश होता. गौरी घुले (भारत), क्रिस्टोफर रॉबर्ट (यूएसए), टेसा ड्रोनकर्स (नेदरलँड्स), लुसिया ग्वाझार्डी (इटली) आणि मेरीना टोलोच्यना (युक्रेन)यांचा समावेश आहे. वरुण ब्लू टीमचा दृष्टीकोन भारताच्या किनारपट्टीवरील समुद्र शैवालपासून बायोप्लास्टिक तयार करणे हा असून नोकर्‍या निर्माण करताना पाणी सुरक्षित आणि प्लास्टिकमुक्त ठेवणे आणि स्थानिक महिलांना पाठिंबा देणे , शेतीत वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिकपासून भारताला दूर हे ध्येय आहे. तसेच खारट पाण्यात विरघळणारे बायोप्लास्टिक विकसित करनार आहेत.
वरुणा ब्लूचे टीम चा प्रमुख म्हणून ओंकार खोतला या पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून 15 डिसेंबर रोजी दुबई येथे एक्स्पो 2020 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हबमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button