breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

एकाच मंचावर फडणवीस, ठाकरे, पवार,आणि एकमेकांवर हसत केलेली टोलेबाजी

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाचं बुधवारी प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभाध्यक्ष नाना पटोले, सभापती रामराजे निंबाळकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार उपस्थित होते.

फडणवीस यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर होते. मात्र सर्वांचं लक्ष फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडे होतं. एकमेकांवर सतत टिका करणारे आज एकाच मंचावर उपस्थित असल्याने गंमतीत का होईना पण एकमेकांना टोलेबाजी करणार हे मात्र निश्चित होेतं. आणि झालंही तसंच…

“देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण सोडून लेखक व्हायला हरकत नाही. तेवढेच आम्हाला शांतपणे जगता येईल. राम नाईक आलेले आहेत. त्यांनी देवेंद्रजींच्या या ज्ञानाचा उपयोग दिल्लीत करून घ्यावा. अर्थात तसे झाले तर सर्वात जास्त आनंद हा सुधीर मुनगंटीवार यांना होईल,” अशी टोलेबाजी करत अजित पवार यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ही संधी न सोडता “पवार यांनी रचलेल्या पायावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळस चढवला. अशा विषयावर भाष्य करावे लागेल, पुस्तक प्रकाशन करावे लागेल असा विचार केला नव्हता. पण हा प्रसंग तुमच्यामुळेच आला, असा चिमटा ठाकरे यांनीही फडणवीस यांना काढला.

तर अशआ पद्धीतीने एकमेकांना कोपरखळ्या देत हा कार्यक्रम छान पार पडला…दरम्यान ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीतही येणार असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button