breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

बीआरटी उद्घाटनानंतर आयुक्त बसमध्ये बसले अनं अडथळा बघताच खाली उतरले

प्रत्येक्ष अनुभवानंतरही उद्घाटनाची घाई,  मग प्रवाशांची अडचणी कोण सोडविणार – विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा सवाल

पिंपरी – निगडी – दापोडी बीआरटी मार्गावर पीएमपी बस सेवेचे आज ( शुक्रवारी) उद्घाटन करण्यात आले. मात्र, बीआरटी मार्गावर सर्वाधिक अडथळा मेट्रोचा आहे. मार्गावर व्यवस्थितीत काॅरीडर नाहीत. सिग्नल बंद अवस्थेत आहेत. प्रवाशांना बस स्टाॅपवर ये-जा करण्यास खासगी वाहनाचा अडथळा आहे. तरीही सत्ताधारी भाजपने अर्धवट स्थितीत असलेल्या बीआरटी मार्गावर घाईघाईने पीएसपी बससेवा सुरु केली. परंतू, प्रवाशांना आरामदायी असलेल्या पीएमपी बस सेवेच्या उद्घाटनानंतर बसमध्ये पालिका आयुक्त श्रावण हर्डिकर स्वताः बसले. रस्त्यावरील खड्डे, जागोजागचे गतीरोधक, बसमधील उष्णता आणि कामाचा अडथळा बघता, दुस-या स्टाॅपलाच आयुक्त बसमधून खाली उतरले. त्यामुळे स्वताः आयुक्ताच एवढ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले. मग शहरातील प्रवाशांच्या अडचणी कोण बघणार ? असा सवाल विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपस्थित केला आहे. 

साने म्हणाले की, निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर पीएमपी बस सेवा सुरु करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि जलद व्हावी, याकरिता बीआरटी मार्ग सुरु करण्यात आला. या मार्गावर दर एका मिनिटानंतर बस धावणार आहे. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडचे पालिका आयुक्त, पीएमपी अधिकारी, सर्व पदाधिका-यांची निगडी ते कात्रज अशी बस चाचणी घ्यायला हवी, त्यानंतर ख-या अर्थाने प्रवाशांना किती अडथळे, अडचणींना सामोरे जावे लागतेय, हे अधिका-यांना समजून येईल,

तसेच निगडी-दापोडी मार्गावर नागरिकांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. मेट्रोचे काम सुरु असताना, रस्त्यावर अनेक अडथळे असल्याचे माहिती असतानाही पालिका आयुक्तांसह भाजप पदाधिका-यांनी बीआरटी बस सेवा सुरु केली.  संपुर्ण सक्षम यंत्रणा तयार होत नाही, तोपर्यत बीआरटी बस सेवा प्रवाशांना अडचणी ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button