breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्राधिकरणाचा विकसित-अविकसित भाग महापालिकेत समाविष्ट करा, भाजप पदाधिका-यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) विकसित असलेला भाग हा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये तर अविकसित असलेला भाग हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली. परंतु, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पीसीएनटीडीएचा संपूर्ण भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करावा, अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.

ढाके यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अगोदरच पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ (एमआयडीसी) या तीन संस्था कार्यरत आहेत. सद्यस्थितीत या संस्थामार्फत शहरामध्ये रस्ते विकसन, निवासी, बिगरनिवासी व औद्योगिक इमारतींना बांधकाम परवानगी देणे, पाणीपुरवठा करणे व शहराचा मुलभूत विकास करणे, इ. विकासकामे केली जातात.

या तीन वेगवेगळ्या संस्थाचे शहराच्या विकासकामावर वेगवेगळे नियंत्रण असल्याने विकास कामांबाबत कोणताही निर्णय घेत असताना वेळोवेळी अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत असतात. आता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) अविकसित असलेला भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचेकडे विकसनासाठी दिल्यास शहराच्या विकास कामांमध्ये आणखी चौथी संस्था निर्माण होईल व त्यामुळे अडचणीमध्ये आणखी भर पडु शकते.

म्हणून शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या व औद्योगीकरण याचा विचार करुन शहराचे सुयोग्य नियोजन होण्यासाठी व विकास कामात उद्भवनाऱ्या अडचणी वेळीच दुर करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) विकसित भागाबरोबर अविकसित असलेला भागही पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये वर्ग करणेत यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती महापौर ढोरे व सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button