breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

HSC Exam | बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर शिक्षकांचा बहिष्कार

HSC Exam | आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार नाही अशी भूमिका घेत विविध मागण्यांकरिता राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. वेतनवाढ, पेन्शन, पदभरती अशा विविध मागण्यांकरिता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मे अखेरीस निकालाची शक्यता!

यंदा राज्य मंडळाने अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीच्या तुलनेत ऑनलाइन प्रणालीमुळे काम अधिक वेगाने होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेवरही होऊ शकतो. त्यामुळे मे अखेरीपर्यंत बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा     –      ‘दोन्ही विरोधी पक्षनेते महायुतीत सामील होतील’; भाजप नेत्याचा मोठा दावा 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आंदोलन सुरू आहे. त्यानुसार, आता आजपासून सुरु होत असलेल्या बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तपासणार नाहीत. जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरणे, अनुदानातील जाचक अटी रद्द करणे, अशा विविध मागण्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकाने ठेवल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button