breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रशासन सहायक आयुक्तांची बदली करा; अन्यथा विधी सभापती पदाचा राजीनामा देणार

विधी समिती सभापती अश्विनी बोबडे यांची आयुक्तांकडे मागणी

बदली न केल्यास विधी समितीची एकही सभा न घेण्याचा आयुक्तांना दिला इशारा

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी विधी समिती सभापती अश्विनी बोबडे यांनी केली. विधी समितीचे शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डिकर यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देवूनही ही मागणी केलीय. दरम्यान, बदली न झाल्यास विधी सभापती व सर्व सदस्य राजीनामा देणार असल्याचा इशाराही आयुक्तांना दिला आहे.

विधी समिती सभापती बोबडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, महापालिका प्रशासन विभागाचे प्रशासन सहायक आयुक्त मनोज लोणकर हे मनमानी कारभार करीत आहेत. ते स्वताः विधी समितीचे अधिकार व कर्तव्यावर गदा आणत आहेत. विधी समितीच्या संबंधित असणारे प्रशासनाचा एकही प्रस्ताव विधी समितीकडे ठेवत नाहीत. प्रशासन विभागाचे अधिकारी हे परस्पर निर्णय घेवू लागल्याचे दिसत आहे.

प्रशासन विभागाच्या संबंधित कोणतीही माहिती मागितल्यास ते देत नाहीत. प्रत्येकवेळी टोलवाटोलवी करुन माहिती देण्यास नकार देतात. प्रशासन विभागाचे कित्येक विषय हे परस्पर महासभेकडे वर्ग केले जात आहेत. तसेच अधिका-यांच्या पदोन्नतीचे अनेक विषय हे स्वताःच निर्णय घेवू लागले आहेत. त्यामुळे प्रशासकीय विषय विधी समितीकडे न आणल्याने त्यांची तत्काळ बदली करावी, त्यामुळे जोपर्यंत त्यांची बदली होत नाही. तोपर्यंत विधी समितीची एकही पाक्षिक सभा घेणार नाही. तसेच विधी समिती सभापती व सर्व सदस्य राजीनामा देण्यात येईलही असेही म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button