breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेट्रोल-डिझेलच्या किमती का वाढवल्या याचं अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण …

महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी, नोकरी व्यवसाय, शिक्षण यासारख्या क्षेत्रांसंदर्भात मोठ्या घोषणा केल्या. सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा पवारांनी केल्या. याचवेळी इंधनावरील कर वाढवल्याचीही घोषणाही पवारांनी केली. पवारांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यामध्ये पेट्रोल-डिझेल प्रती लिटर एक रुपयांनी वाढले आहे. त्यावर त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून टीकाही झाली…मात्र ही करवाढ का करण्यात आली याचे स्पष्टीकरण पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिलं आहे.

“शेतकऱ्यांच्या तसेच शहरांच्या दृष्टीने महत्वाची अशी अनेक पर्यावरण पुरक कामे हाती घेतली जाणार आहेत. वातावरण बदल हा भविष्यातील खूप मोठ प्रश्न असून त्यासंबंधित काम करण्यासाठी शासनाला निधीची आवश्यकता आहे,” असं पवारांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. “अतिरिक्त विशेष समर्पित निधीची आवश्यकता राज्य शासनाला आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या हरित योजना राबवण्यासाठी सध्या इंधनावर असणाऱ्या करामध्ये प्रती लिटर एक रुपयाने वाढवून मुल्यवर्धित कर आकारण्याचा प्रस्ताव मांडत आहे,” असं पवारांनी स्पष्ट केलं.

राज्याला ग्रीन सेज फंडांची आवश्यकता आहे. त्यामुळे इंधन दरवाढ करण्यात आली असल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. “बाजूच्या राज्यात बघतीलं तर कालच कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर आपल्यापेक्षा जास्त वाढवले आहेत. तिथं भाजपाचं सरकार आहे. त्यांच्याकडे दर आपल्यापेक्षा जास्त झालेले आहेत. मात्र त्याचं झालं म्हणून आपलं झालं पाहिजे असा माझा दृष्टीकोन नाही. पण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट, अवकाळी पाऊस, गारपीट अशा सतत काही ना काही नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडतातय. आधीच्या पिढीने योग्य पावले उचलली असती तर आमच्यावर हे संकट आलं नसतं असा दोष पुढच्या पिढीनं आम्हाला देता कामा नये यासाठीच सरकारने काळजी घेतली आहे. प्रत्येक विभागाला दिलेल्या उद्दिष्ठापेक्षा जास्त रक्कम कशी मिळेल यासंदर्भात सरकारचा प्रयत्न राहिलं,” असं पवारांनी या दरवाढीचं समर्थन करताना स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button