breaking-newsआंतरराष्टीय

रशिया जगातील पहिली कोरोनावरील लसीची नोंदणी १२ ऑगस्टला करणार

मॉस्को – कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी जगातील अनेक देश प्रयत्नशील आहेत. त्याच दरम्यान रशियाने एक आनंदाची बातमी दिली आहे. काही देशांनी कोरोनावर यशस्वी लस बनवल्याचा दावा केला असून त्यामध्ये रशिया एक आहे. कोरोनावरील लसीच्या सर्वच चाचण्या करण्यात आल्या असून त्या यशस्वी झाल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको व उप आरोग्यमंत्री ओलेग ग्रिदनेव यांनी सांगितले आहे की, रशियाने कोरोना लसीची चाचणी पूर्णपणे यशस्वी केली असून रशिया १२ ऑगस्ट रोजी जगातील पहिली कोरोनावरील लसीची नोंदणी करणार आहे.

सर्व काही सुरळीत सुरू राहिले तर ऑक्टोबर महिन्यापासून रशियामध्ये लसीकरणाचे काम देखील सुरू होईल असेही रशियाचे उप आरोग्यमंत्री ओलेग ग्रिदनेव म्हटले आहे. ग्रिदनेव असेही म्हणले की, रशियात कोरोना विषाणूवरील लसीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. क्लिनिकल चाचण्या १००टक्के यशस्वी झाल्या आहेत. रशियन संरक्षण मंत्रालय आणि गमलेया नॅशनल सेंटर फॉर रिसर्च यांनी ही लस तयार केली आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये ज्यांच्यावर लसीची चाचणी करण्यात आली. त्या सर्वांमध्ये सार्स-कोव्ह-२ ची रोग प्रतिकारकशक्ती असल्याचे समोर आले आहे. तसेच ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. उफा शहरातील कॅन्सर सेंटर इमारतीच्या उद्घाटनावेळी उपआरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली. ही लस सुरुवातीला आरोग्य विभागातील कर्मचारी आणि वयस्कर व्यक्तींना दिली जाणार आहे.

४२ दिवसांपूर्वी लसीच्या प्रयोगाला सुरूवात

रशियामध्ये कोरोनावरील लसीच्या प्रयोगाला ४२ दिवसांपूर्वी सुरूवात झाली. त्यावेळी मॉस्कोमधील बुरदेंको सैन्य रुग्णालयातील स्वयंसेवकांना (वैज्ञानिक संशोधकांना) कोरोना लस देण्यात आली. ही लस टोचल्यानंतर डॉक्टरांना लक्षात आले की, या सर्वांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. या चाचणीनंतर रशियन सरकारने लसीचे कौतुक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button