breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्रवासी विमानात शिंकला, वैमानिकाने थेट दरवाजातून घेतली उडी

पुणे – जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्वांनी करोनाचा मोठा धसका घेतला आहे. अशा परिस्थितीत एक विचित्र घटना शुक्रवारी विमानात घडली. पुण्याहून दिल्लीला जाणारं एअर एशियाचं एक विमान उड्डासाठी तयार होतं. सर्व प्रवासी आपल्या जागेवर बसले होते. त्याचवेळी पुढील सीटवर बसलेला एक प्रवासी शिंकला आणि ते पाहून संपूर्ण कर्मचारी वर्गचाचीच भांबेरी उडाली. कॉकपीटमधल्या वैमानिकाला जेव्हा या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्यानं थेट आपात्कालिन दरवाज्यातून खाली उडीच घेतली.

या प्रकारानंतर विमानातील क्रू मेंबर्सनी मागील बाजूचा दरवाजा उघडला आणि सर्व प्रवशांना विमानाच्या बाहेर काढलं. यानंतर सर्व प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात आलं. त्यात सर्व प्रवाशांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. “पहिल्या रांगेत बसलेल्या प्रवाशामुळे २० मार्चला पुणे दिल्ली विमानात असा प्रकार समोर आला आहे. करोनाबाबत सर्वजण सतर्क आहेत. यासाठी सर्वांचं मेडिकल स्क्रीनिंग करण्यात आलं. परंतु सर्वाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. खबरदारी म्हणून विमान रिमोट बे मध्ये उभं करण्यात आलं. संशयित प्रवाशाला पुढील दरवाज्यानं तर अन्य लोकांना मागील दरवाज्यानं बाहेर काढण्यात आलं,” अशी माहिती एअर एशियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button