breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रवासी तक्रारीबद्दल संवेदनशील राहा: परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रवासीभिमुख सेवांच्याबाबतीत जागरूक राहून,प्रवाश्यांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांचा तक्रारीचा तातडीने निपटारा करण्यासाठी प्रयत्नशील राहा. अशा सूचना वजा आदेश देऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचेअध्यक्ष  ॲड. अनिल परब यांनी एसटीच्या वाहतूक विभागाला उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आदेश दिले.  मार्गावरील प्रवासी संख्येचा विचार करून बस फेऱ्यांचे नियोजन करा  

आज एसटी महामंडळाच्या मुख्यालयात वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेत असताना परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब यांनी प्रवाशांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांच्या तक्रारी व सूचनांचे संवेदनशीलतेने पालन करण्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी अनेक सूचना  वाहतुक विभागाला केल्या. ते म्हणाले कि, एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने उत्पन्न वाढविण्यासाठी बसफेऱ्यांचे योग्य नियोजन करावे, त्यासाठी नफ्यातील मार्गांचा आढावा घेऊन त्या मार्गावर अधिकाधिक वक्तशीर बसफेऱ्या सुरु कराव्यात. तसेचआठवड्यातील ज्या दिवशी प्रवाशी चढ-उतार कमी असेल त्यादिवशी बस फेऱ्यांची संख्या कमी करून , खर्चामध्ये बचत करावी. 

शालेय फेऱ्या वक्तशीर सोडाव्यात

एसटीच्या आगारव्यवस्थापकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक/ प्राचार्यांना भेटून शाळा-महाविद्यालये सुरू व सुटण्याच्या वेळेनुसार बस फेऱ्यांचे नियोजन करावे. कोणताही विध्यार्थी अथवा विद्यार्थिनी शाळेत वेळेवर पोहोचले पाहिजे .तसेच शाळा सुटल्यानंतर कुठेही रेंगाळत न राहता तो/ ती एसटी बसने थेट लवकरात लवकर घरी पोहचले  पाहिजेत, याची दक्षता त्या विद्यार्थयांच्या शाळेतील शिक्षकाप्रमाणे एसटीच्या आगारव्यवस्थापकांनी घेणे आवश्यक आहे.   बसस्थानकावरील प्रसाधनगृहे स्वच्छ असली पाहिजेत   

   प्रवाश्याच्या दृष्टीने बसस्थानकावरील स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी व बसस्थानकचा स्वच्छ-सुंदर परिसर या तीन मूलभूत गरजा आहेत. हे लक्षात घेऊन बसस्थानकावरील प्रसाधनगृहे, पिण्याचे शुद्ध पाणी व स्वच्छ नीटनेटका परिसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहा. गरजेनुसार वरील सेवा सशुल्क द्या , पण सेवेच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड करू नका. 

प्रादेशिक कार्यालये पुन्हा सुरु करा

आगार व विभागांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन व मूल्यमापन करणारी उत्तरदायित्वशील प्रादेशिक कार्यालये पुनश्च सुरु करण्याचे आदेश  मंत्री,  ॲड. अनिल परब यांनी दिले. त्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव संबंधित विभागाने आपल्याकडे मंजुरीसाठी पाठवावा .असे निर्देश त्यांनी दिले.  

या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा सध्या कार्यभार असलेले परिवहन आयुक्त शेखर चन्ने, वाहतूक विभागाचे प्रमुख राहुल तोरो यांच्यासह वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button