breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

चतुर्थश्रेणी कर्मचार्याची पदे कंत्राटी तत्वावर घेण्याला विरोध

भाजपा शिक्षक आघाडी पिंपरी-चिंचवडच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदने

पिंपरी | प्रतिनिधी

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता /पुर्णतः अनुदानीत माध्यमिक व उच्य माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचार्याची पदे यापुढे कायमची व्यपगत करत प्रती शाळा, प्रती माह-भत्ता या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा महाराष्ट् सरकारने निर्णय घेतला आहे. त्याचा भाजपा शिक्षक आघाडी पिंपरी-चिंचवडच्या वतीने निषेध करण्यात आला. या बाबत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, राज्य मंत्री -शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांना पत्र पाठवित निषेध व्यक्त करण्यात आला.

या बरोबर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग, तसेच पुणे येथील आयुक्त ( शिक्षण विभाग), जिल्हा शिक्षण अधिकारी, उपजिल्हा शिक्षण अधिकारी, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि शिक्षण उपसचालक विभाग यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आली.

भाजपा शिक्षक आघाडी पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष धनंजय जगताप, संघटक संजय शेंडगे, सरचिटणीस दत्तात्रय यादव, उपाध्यक्ष सदाशिव कांबळे, कार्यकारिणी सदस्य वसंत घारे, आदी पदाधिकारी तसेच शिक्षक आघाडी कार्यकारीणी सदस्य बी. टी. महाजन, उमेश तिवारी आणि भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हाचे उपाध्यक्ष तथा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अर्जुन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच पुणे येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, उपसंचालक पुणे विभाग कार्यालय आणि आयुक्त ( शिक्षण ) कार्यालय या ठिकाणी शिक्षक आघाडी चे प्रदेश सह संयोजक मा. डॉ. प्रशम कोल्हे, पुणे विभाग संयोजक बबनराव उकिर्डे, पुणे ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष संतोष कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) नियमावली पायदळी तुडवून, संपूर्ण शिक्षण व्यवस्था संपुष्टात आणणारा हा निर्णय आहे. राज्यातील सर्व अनुदनीत शिक्षण पद्धत बंद करण्याचे शासनाचे षडय़ंत्र आहे. यामुळे सर्व शिक्षणव्यवस्था अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे शासनाने काढलेला नवीन अध्यादेश त्वरित रद्द करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button