breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रलंबित प्रश्नांच्या नोटीसांची करणार होळी – विरोधी पक्षनेते दत्ता साने

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, शास्तीकर, रेडझोन यासह पाणी टंचाई, कचरा आणि आरोग्याचे प्रश्न सोडविण्यास सत्ताधारी भाजप अपयशी ठरले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सत्ता द्या, शंभर दिवसात रेडझोन, अवैध बांधकामे आणि शास्तीकरांचा प्रश्न सोडवितो, असे आश्वासन पिंपरी-चिंचवडकरांना दिले होते. परंतू, दीड वर्षानंतरही हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्याचा निषेध म्हणून शास्तीकरांची नोटीसाची होळी रावण दहनात करणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिली. 

चिखली येथील वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल सार्वजनिक मंडळातर्फे दसऱ्या निमित्त रावण दहनाचा कार्यक्रम (गुरुवारी दि.१८) सांयकाळी ६ वाजता साने चौकात होणार आहे. यावेळी सिनेअभिनेता डॉ.अमोल कोल्हे आणि सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड उपस्थित राहणार आहेत. 

दत्ता साने म्हणाले, १०० दिवसांत रेड झोन, शास्तीकराचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊन पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाने सत्ता मिळवली. परंतु दोन वर्षानंतरही दोन्ही प्रश्न सुटले नाहीत. फक्त शासकीय निर्णय झाला असा प्रसार करुन फ्लेक्सबाजी व साखर वाटली गेली. प्रत्यक्षात कृती काहीच नाही. त्यामुळे सामान्य नागरीकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्याचा निषेध म्हणून या रावण दहनाच्या कार्यक्रमात शास्तीकरांच्या नोटीसांचे दहन करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button