breaking-newsमनोरंजन

प्रभास लवकरच अडकणार लग्नबेडीत

“बाहुबली’ या चित्रपटात अमरेंद्र बाहुबली आणि महेंद्र बाहुबली या व्यक्तिरेखा साकारून अभिनेता प्रभासने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या अभिनायासोबतच स्मार्ट लूकनेही चर्चेत असलेला हा अभिनेता विवाह बंधनात कधी अडकणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अशात आपल्या वाढदिवसादिवशी म्हणजेच येत्या 23 ऑक्‍टोबरला प्रभास आपल्या लग्नाविषयीची घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रभास बाहुबलीच्या सिक्वलमधील सहकलाकार अनुष्का हिच्याशी विवाह करणार असून हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण प्रभास आता दाक्षिणात्य कलाकार चिरंजीवींची पुतनी निहारिका हिच्यासोबत लग्नबेडीत अडकणार असल्याचे समोर आले आहे.

याबाबतची घोषणा आता प्रभास स्वत: करणार असल्याचे समोर येत असल्याने या दिवसाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, प्रभास लवकरच “साहो’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे आणि नील नितीन मुकेश हे कलाकारही यात महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button