breaking-newsमनोरंजन

‘मणिकर्णिका’मधील कंगनाचा रॉयल लूक रिलीज

बहुचर्चित चित्रपट ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’मधील कंगना राणावतचा फर्स्ट लूक आज रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात कंगना मुख्य राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार असून पहिल्यांदाच ती एका योद्धाची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मणिकर्णिका चित्रपटाच्या टिझर लॉन्चची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार आहे.

कंगना राणावतने चित्रपटाचा फर्स्ट लूक आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोत गणपतीची भव्य मूर्ती दिसत असून त्यासमोर लाल रंगाच्या साडीत आणि दागदागिन्यांनी सजलेली कंगना खरोखरच राणी वाटत आहे. या चित्रपटासाठी कंगनाने कोणताही डुप्लिकेट न वापरता स्वतः घोडेस्वारी आणि तलवारबाजी केली आहे. यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती जखमीही होती.

मणिकर्णिका चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कृष जगाराला मुंडी केला आहे. दरम्यान, या चित्रपटातून अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button