breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पोटनिवडणूक निकाल अपडेट : चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, तर कसब्यात रविंद्र धंगेकरआघाडीवर!

पुणे : चिंचवड विधानसभा विधानसभा पोटनिवडनुक मतमोजणीची दुसरी फेरी संपत आली आहे. दुसऱ्या फेरीअखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना ७,९९६ मते मिळाली आहेत. दूसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ६४७ मतांची आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात होईल. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

आज साहेबांची आठवण येतेय : अश्विनी जगताप

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे निकालाकडे बघताना फारसा उत्साह वाटत नसल्याची प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी दिली आहे. “मला आज साहेबांची (लक्ष्मण जगताप) खूप आठवण येतेय. निकालाकडे बघताना तसा फार उत्साह नाही. पण लोकांना न्याय द्यावा, त्यांच्या पाठीवर हात फिरवणारं कुणी असावं, त्यांची कामं वेळच्यावेळी व्हावीत, त्यांना भक्कम आधार देणारं कुणीतरी असावं यासाठी खरंतर मी निवडणुकीसाठी उभी राहिले. ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे. भाजपाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी इथे येऊन मला पाठिंबा दिला, सभा घेतल्या. भाजपाचे आख्ख्या भारतातून कार्यकर्ते आले होते. त्यांना मी धन्यवाद देईन”, असं अश्विनी जगताप म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button