breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभागात ‘सबका साथ सबका विकास’ घोषणेनूसार विकास कामे करु

– सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांचे भूमिपूजन 
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या वतीने पुर्णानगर प्रभाग क्रमांक 11 मधील परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते आज (सोमवार) करण्यात आले. यावेळी पूर्णानगर प्रभाग क्रमांक 11 मधील परिसरात सबका साथ सबका विकास या भाजपच्या धोरणानूसार विकास कामे करण्यात येणार येतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.    
यावेळी क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, नगरसेविका योगीता नागरगोजे, भिमा बोबडे, गोरख पाटील, अतुल माने, निलेश सुंभे, संतोष ठाकुर तसेच येथील स्थानिक नागरिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पूर्णानगर परिसरात प्रत्येक या रस्त्यांच्या कडेला नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ, वाहनांना पार्किंग व्यवस्था, नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस, डस्टबीन, असे स्मार्ट कॉंक्रीटचे रस्ते प्रभाग ११ मधील नागरिकांना लवकरच बघायला मिळतील.
एकनाथ पवार म्हणाले कि, शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आवश्यक सुविधा देण्याचा आमचा भर आहे, आम्ही सत्तेत आल्यापासून सबका साथ सबका विकास या घोषणेप्रमाणे काम करीत आहे. प्रत्येक प्रभागात आम्ही कामे केली आहेत. शहरातील जनतेने आम्हाला भरभरुन प्रेम दिले आहे. त्यामुळे सर्वाना आम्ही सोबत घेऊनच विकास कामे करीत आहोत. प्रभागाचा शाश्वत आणि समग्र विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच प्रभागातंर्गत होणाऱ्या विकास कामांमधून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. असा विश्वास पक्षनेते पवार यांनी व्यक्त केला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button