पिंपरी / चिंचवड

प्रतिक्षाला शिक्षणासाठी रयततर्फे आर्थिक मदत

पिंपरी – हालाखीची परिस्थिती असताना प्रतिक्षा सौदागर शिंदे या होतकरू विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नयेसाठी रयत विद्यार्थी मंचतर्फे प्रतिक्षाला चार हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. अशी माहिती मंचचे अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी दिली.

 

वारंवार शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागल्याने शारिरीक व्याधिंचा प्रतिक्षाच्या आईला सामना करावा लागतो. तर, अपघातात वडिलांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना अंपगत्व येऊन त्यांचे निधन झाले. कुटुंबाचा आर्थिक उतरनिर्वाहाचा मार्ग खुंटल्याने प्रतिक्षाच्या दहावी नंतरच्या शिक्षणाचे काय? असा प्रश्न निर्माण समोर निर्माण झाला असताना तिने दहावीच्या परीक्षेत 92.20 टक्के गुण मिळविले आहेत.

 

प्रतीक्षाला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा होता. त्यासाठी तिने रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेकडे व्यथा मांडली होती. या संस्थेच्या  वतीने ४ हजार रुपये शैक्षणिक मदत करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष साळवे यांच्यासह महासचिव संतोष शिंदे, कार्याध्यक्ष अंजना गायकवाड, उपाध्यक्ष संदेश पिसाळ व प्रतिक्षाचे पालक उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button