breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: आणखी बळी गेले तरी चालतील, अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेतील सर्व व्यवहार सुरु करा अशी भूमिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली आहे. डोनाल्ड ट्रम्प सातत्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा मुद्यावर भर देत आहेत. ‘करोना व्हायरसमुळे जास्त नागरिक आजारी पडले किंवा मृत्यू झाले, तरी अमेरिकन नागरिकांनी त्यांचे दैनंदिन कामकाज सुरु करावे’ असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

एरिझोना प्रांतातील फोनिक्स शहरामध्ये ते बोलत होते. महिन्याभरानंतर वॉशिंग्टनबाहेर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. करोना व्हायरसविरोधात आता दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. करोना व्हायरसविरोधात व्हाइट हाऊसने एक टास्क फोर्स बनवली आहे. यात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही टास्क फोर्स विसर्जित करण्यात येणार आहे.अमेरिकेत करोना व्हायरसमुळे अत्यंत बिकट परिस्थिती आहे. पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या मुद्दावर ठाम आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अहवालानुसार अमेरिकेत करोना व्हायरसमुळे ७१ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १२ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button