breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांसह गुणरत्न सदावर्तें यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

सातारा |महाईन्यूज|

खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत गैर शब्द वापरल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि वकील गुणरत्न सदावर्ते या दोघांविरोधात सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे यांचा नामोल्लेख न करता ‘बिनडोक राजा’ म्हणत जहरी टीका केली होती. तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी राजेंबद्दल अपशब्द वापरले. दोन्ही राजेंबाबत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आंबेडकर आणि सदावर्ते या दोघांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे समनवय समितीचे भागवत कदम आणि राजेंद्र निकम यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून सातारा शहर पोलिस ठाण्यात दोन अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, ही घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जहरी टीका केली. उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांचा नामोल्लेख न करता ‘एक राजा बिनडोक आहे, तर दुसऱ्याचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर आहे. त्यांना राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्रर्य वाटतं, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी घणाघात केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button