breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांना अटक

पिंपरी / महाईन्यूज

विनामास्क दुचाकीवर बेफान निघालेल्या तरुणांवर कारवाई करताना पोलिसांसोबत हुज्जात घालून दुचाकीचालकाने त्यांना शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा निर्माण करून पोलीस कर्मचा-यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार काल मंगळवारी (दि. 3) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात घडला.

अभिषेक राजू टेंकल (वय 18, रा. प्लॉट नं. 41, रा. विष्णु कृपा वसाहत, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ, पुणे) आणि हरिष गणेश कांबळे (वय 18, रा. प्लॉट नं. 11, रा. साईबाबा मंदिराजवळ, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. कांबळे याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. सांगवी वाहतूक पोलिसांचे मंगळवारी (दि. 3) सायंकाळी पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात मोटार व्हेईकल कायद्यानुसार कारवाईचे सत्र सुरू होते. दरम्यान, एमएच 12, एनक्यू 5145 या क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन तरुण विनामास्क जात होते. त्यांना बाजुला घेऊन कारवाईच्या अनुषंगाने चौकशी केली असता. तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली. चीड आल्याने ”या पोलिसांची आई झ….तो” अशा प्रकारे अश्लील शब्दप्रयोग करून शिवीगाळ केली.

पोलीस नाईक केदारी यांच्याशी धक्काबुक्की केली. पोलीस हवालदार असवले यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या छातीला हात लावून तुझे नाव सांग असे म्हणत शिवीगाळ केली. दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button