breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
पोलिसांची बारमध्ये धाड, 24 बारबाला करत होत्या अश्लील नृत्य
मुंबई |महाईन्यूज|
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबईनगरी सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात पोलिसांनी एका बारवर छापा टाकला आहे. या बारमध्ये 24 बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्या.
अंधेरीच्या पिंक प्लाजा बारमध्ये पोलिसांनी संध्याकाळी धाड टाकली. या बारमध्ये 24 बारगर्ल या अश्लिल नृत्य करत असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी या बारबालांना ताब्यात घेतलं आहे. तसंच 7 ग्राहक, 2 मॅनेजर आणि 2 वेटर्सला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहे.