breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलिसांकडून रोजा इफ्तारी, सौहार्दाचे अनोखे दर्शन

वाकड पोलिसांचा अनोखा उपक्रम

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी मुस्लिम बांधवांचा रोजा सुरू असल्याने त्यांना इफ्तारीच्या वेळेस म्हणजे रोजा सोडतांना फळे आणि खजूर सेवन करणे गरजेचे असल्याची बाब लक्षात घेत मदत केली आहे.

गरीब मुस्लिम बांधवांना फळं आणि खजूर वाटप करत अनोख्या पद्धतीने सौहार्दाचे दर्शन घडवलय ,एकीकडे लॉकडाऊन दुसरीकडे ,संपूर्ण पिंपरी शहरला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केल्या गेल्याने कुणालाही बाहेर पडता येन शक्य नसल्याने ,इफ्तारीसाठी हे खाद्य पदार्थ आणायचे कसे हा प्रश्न अनेक मुस्लिम बांधवांना पडला होता मात्र वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर आणि पोलीस अधिकारी सतीश माने ह्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी स्वतः जवळील पैसे जमवत हे साहित्य खरेदी केल आणि गरजू मुस्लिम बांधवांना घरपोच नेऊन दिलं,

विशेष म्हणजे रमजान महिन्यातील सर्व नमाज मस्जिद मध्ये पठण करणं अनिवार्य असतांनाही केवळ कोरनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांकडून घरात बसूनच नमाज पठण केल्या जात असल्याने मुगळीकर ह्यांनी त्यांचे आभार मानून अशाच पद्धतीने शहरातील सर्व।नागरिकांनी अजून काही दिवस सहकार्य केल्यास कोरनो विरुद्धचा लढा आपण नक्की जिकुं असा विश्वास पो.नि.विवेक मुगळीकर यांनी विश्वास व्यक्त केला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button