breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत

मुंबई : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये कर्तव्य बजावत असताना अग्निवीर अक्षय गवते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अक्षय गवते हे शहीद झालेले पहिले अग्निवीर आहेत.अक्षय हे मूळचे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावचे आहेत. अग्निवीर अक्षय गवते यांच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, असा असणार मोदींचा शिर्डी दौरा

सीएमओ महाराष्ट्र या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करत शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जवान अक्षय गवते हे चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button