breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना अटक

पिंपरी |महाईन्यूज|

घरफोड्या, वाहन चोरी, मोबाईल चोरी करणा-या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट तीनकडून अटक करण्यात आली. त्यांच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली. घरफोडी, वाहन चोरीचे एकूण नऊ गुन्हे उघड करत तब्बल 7 लाख 68 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शेखर संभाजी जाधव (रा. भोसरी), विकी मांझी (रा. भोसरी), कृष्णा संजय तांगतोडे (रा. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते सध्या येरवडा कारगृहात आहेत. आरोपी किरण गुरूनाथ राठोड (रा. दिघी रोड, भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून तो फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण राठोड एका अल्पवयीन मुलासह नाशिक फाटा येथे चोरीचा माल विक्री करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या नुसार युनिट चारच्या पथकाने नाशिक फाटा येथे सापळा लावला. पथकाने त्याठिकाणाहून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

मात्र, किरण राठोड तिथून पळून गेला. पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केली असता त्याने वरील चार आरोपींसोबत पिंपरी चिंचवड परिसरात नऊ गुन्हे केल्याचे उघड केले. पोलिसांनी त्यांच्या जवळून 66 ग्रॅम सोन्याचे दागिने, 28 ग्रॅम चांदिचे दागिने, 4 एलसीडी, 3 मोटारसायकल, 1 लॅपटॉप, 1 टॅब, 1 मोबाईल, 4 मनगटी घड्याळं, गॅस सिलेंडर व शेगडी असा एकुण तब्बल 7 लाख 68 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणातील आरोपी घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी करणारे सराईत आहेत. आणि सर्वांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये शेखर संभाजी जाधव याच्यावर 23, विकी मांझी 18, कृष्णा तांगतोडे 19 तर, किरण राठोड याच्यावर 04 गुन्हे दाखल आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button