breaking-newsराष्ट्रिय

पुलवामात लष्कराची मोठी कारवाई, चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी सांयकाळी झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या कारवाईनंतर दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. पुलवामातील पिंगलिश गावात रविवारी सांयकाळी चकमक झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

६४४ लोक याविषयी बोलत आहेत

पिंगलिश गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या ४२ राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचे एसओजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी त्या परिसरात शोध मोहीम सुरु केली. त्यावेळी एका घरात हे दहशतवादी लपून बसले होते. त्यांना शरण येण्याची आवाहन करण्यात आले. पण त्यांनी उलट सुरक्षादलावर गोळीबार केला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत या दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.

सुरक्षेच्या कारणास्तव सीआरपीएफची अतिरिक्त तुकडी परिसरात तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button