ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मेडिपॉइंट व बालेवाडी गाव ते खडकी बाजार असे दोन नवीन बसमार्ग सुरू

पिंपरी चिंचवड | पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक 126 अ/1 मेडिपॉइंट ते खडकी बाजार व मार्ग क्रमांक 129 अ/2 बालेवाडी गाव ते खडकी बाजार असे दोन नवीन बसमार्ग स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आले. या दोन नवीन बस मार्गांचे उद्घाटन पीएमपीएमएलचे संचालक तथा पुणे मनपा सभासद प्रकाश ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे, बालेवाडी आगार व्यवस्थापक दत्तात्रय माळी, टाईम कीपर मारुती बालवडकर उपस्थिती होते.

* मार्ग क्रमांक 126 अ/1 मेडिपॉइंट ते खडकी बाजार या बस सेवेचा मार्ग

वसुंधरा लॉन्स, डी पी रोड कॉर्नर (जाताना), रिलायन्स मॉल (येताना), परीहार चौक, ब्रेमेन चौक, स्पायसर कॉलेज बोटॅनिकल गार्डन, एलआयसी कॉलनी, डॉ. सय्यद दवाखाना, गणपती मंदिर बोपोडी, भाऊराव पाटील चौक, बोपोडी गाव, मानाजी बाग, आलेगावकर शाळा असा असेल.

* मार्ग क्रमांक 126 अ/2 बालेवाडी गाव ते खडकी बाजार या बस सेवेचा मार्ग

देसाई पोल्ट्री फार्म, चाकणकर मळा, अभ्युदय बँक, ज्युपिटर हॉस्पिटल, ताम्हाणे चौक, पंपिंग स्टेशन, मेडिपॉइंट वसुंधरा लॉन्स, डी पी रोड कॉर्नर (जाताना), रिलायन्स मॉल (येताना), परीहार चौक, ब्रेमेन चौक, स्पायसर कॉलेज बोटॅनिकल गार्डन, एल आय सी कॉलनी, डॉ. सय्यद दवाखाना, गणपती मंदिर बोपोडी, भाऊराव पाटील चौक, बोपोडी गाव, मानाजी बाग, आलेगावकर शाळा असा असेल.सध्या या दोन्ही मार्गांवर दर अर्ध्या ते एक तासाला बस उपलब्ध असेल. प्रवासी संख्या व उत्पन्नात वाढ झाल्यास या दोन्ही मार्गांवर आणखी बस सोडल्या जातील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button