breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात 49 लाख रुपयांचे कोकेन जप्त, एकाला अटक

पुणे – अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकाला आज (शुक्रवारी) पुणे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सुमारे 49 लाख रुपये किमतीचे 488 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. तसेच आठ लाख रुपये रोकड, विदेशी मद्याच्या बाटल्या व होंडा सीआरव्ही कार असा एकूण 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फॉलरीन अब्दुल अजिज अन्डोई असे या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकाचे नाव आहे. पुण्यातील बाणेरमध्ये तो राहात होता. बाणेर-औंध परिसरात पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.

यापुर्वीही 2013 मध्येही आरोपीवर अंमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी कारवाई झाली होती. त्यात त्याला चार वर्षे कारवासाची शिक्षा झाली होती. शिक्षा संपल्यानंतर तो पुन्हा अंमली पदार्थांच्या विक्रीत उतरला होता. पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button