breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
खासदार संजय राऊत यांना धमकी, आरोपीला अटक
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी कोलकाता येथील रहिवाश्याला अटक केलेली आहे. आरोपी पलाश बोस हा दक्षिण कोलकाता येथील रहिवासी आहे. त्याने कंगना रणौत हिचं समर्थन करत संजय राऊत यांना धमकी दिलेली होती.