breaking-newsमनोरंजन
प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’साठी घेतले ‘याचे’ प्रशिक्षण
छोट्या पडद्यावरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय लोकप्रिय ठरले आहे. मालिकेत येसूबाईंचे पात्र अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत आहे. यासाठी प्राजक्ताने खास घोडेस्वारीचे आणि तालवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे.
प्राजक्ता म्हणाली, ”सर्वांना माहिती आहे की येसूबाईंचे पात्र हे घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये तरबेज आहे. यामुळे माझ्यावर या कला उत्तमप्रकारे छोट्या पडद्यावर साकारण्याची जबाबदारी होती. तशी मी प्राण्यांना खूप घाबरायचे. मात्र, मालिकेत माझी एन्ट्रीच घोड्यावरून होती. ट्रेनिंगच्या पहिल्या दिवशी मी घोड्याला हात लावायलासुद्धा घाबरले. परंतु नंतर हळूहळू मी शिकत गेले आणि पहिल्याच सिनमध्ये घोडा पळवला”.