breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्‍ती केली आहे. हे निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मतदारांना निवडणुकीसंदर्भात काही तक्रारी अथवा अडचण मांडावयाची असल्यास निवडणूक खर्च निरीक्षकांशी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च निरीक्षकांची नावे व त्यांचे मोबाइल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. या सर्व निरीक्षकांची निवास व्यवस्था व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, पुणे येथे करण्यात आली आहे. नागरिक या खर्च निरीक्षकांना भेटून तक्रारी देऊ शकतात.

जुन्नर, आंबेगाव व खेड विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून पिजूष मुखर्जी (मो. क्रमांक- 9404541959), शिरूर, दौंड व इंदापुरसाठी रोशन लाल, (मो. क्रमांक -9404542504), बारामती, पुरंदर व भोरसाठी अमलेंदू नाथ मिश्रा (मोबाइल क्रमांक -9404540280) असा आहे. मावळ व चिंचवडसाठी रोहित मेहरा (मो. क्रमांक -9404542546) तर, पिंपरी व भोसरीसाठी अमरसिंग नेहरा (मो. क्रमांक -9404541239), वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघासाठी किरण कट्टा (मो. क्रमांक -9404541610), शिवाजीनगर, कोथरूड व खडकवासलासाठी विजय चौधरी (मो. क्रमांक -9404541631), पर्वती, हडपसर व कसबापेठसाठी सैलेन समादर (मो. क्रमांक 9404539878).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button