breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात धावपट्टीवर अडकलेले विमान हलविण्यात अखेर यश

पुणे – लोहगाव विमानतलाच्या धावपट्टीवर अडकलेले हवाई दलाचे लढाऊ विमान अखेर हलविण्यात यश आले आहे. तासाभरात विमानसेवा सुरू होणार, अशी माहिती लोहगाव विमानतळ प्रशासनाने दिली. 8 विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. सुमारे 1 हजार प्रवासी अडकले आहेत.

लोहगाव विमानतळावर सरावादरम्यान हवाईदलाचे लढाऊ विमान उतरत असताना टायर फूटण्याची घटना सोमवारी सकाळी 10.00 ते 10.30 च्या सुमारास घडली. त्यामुळे ते विमान मुख्य धावपट्टीवरच अडकून पडले होते.

परिणामी पुण्याकडे येणारी आणि पुण्याहून जाणारी विमान वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. तरी तासाभरात विमानतळ वाहतूक पुर्ववत सुरु होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button