breaking-newsTOP Newsपुणे

पुण्यात कोरोनाबळींच्या संख्येने ओलांडला २ हजारांचा टप्पा

पुणे – मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात मरण पावलेल्या रुग्णांच्या आकडेवारीने २ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता एक लाखाकडे वाटचाल करत आहे. जिल्ह्यात सध्या ८८ हजार ८६१ कोरोनाचे रुग्ण असून आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ३५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

राज्यात शनिवारी १० हजार जण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ६०१ नवे रुग्ण सापडले. शनिवारी राज्यात ३२२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूची संख्या १५ हजार ३१६ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्ण ४ लाख ३१ हजार ७१९ एवढे झाले आहेत. त्यापैकी १ लाख ४९ हजार २१४ रुग्ण उपचार घेत आहेत, त्यातले ४६ हजार ३४५ पुण्यातील आहेत. मुंबईत १ हजार ५९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत २० हजार ७४९ सक्रिय रुग्ण आहेत. तर मृत्यूचा आकडा ६ हजार ३९५ झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button