breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

धक्कादायक! नालासोपाऱ्यात बॅगमध्ये सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह

मुंबई |

नालासोपारा येथे एका बॅगमध्ये ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडालेली आहे. नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडे श्रीराम नगर येथे मृतदेह असणारी ही बॅग सापडली आहे. ही महिला नक्की कोण आहे, तिची हत्या कोणी केली, ही बॅग या ठिकाणी कोणी ठेवली याचा शोध तुळींज पोलीस घेत आहेत.

रविवारी रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान श्रीराम नगर येथील मुख्य रस्त्यालगत एक बॅग दिसून आली. या काळ्या बॅगमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला. ही महिला कोण आणि तिची हत्या कोणी व का केला याचा पोलीस तपास करीत आहेत. या परिसरामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

वाचा- देहूत संचारबंदी ; तुकाराम बीज सोहळ्यासाठी ५० लोकांनाच मिळणार मंदिरात प्रवेश

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button