breaking-newsराष्ट्रिय

देशात २४ तासांत तब्बल ५४ हजार ७३६ नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – भारतात कोरोनाच धुमाकूळ वाढतच आहे. गेल्या 24 तासांत देशात 54 हजार 736 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 853 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17 लाख 50 हजार 724 इतकी झाली आहे. त्यापैकी सध्या 5 लाख 67 हजार 730 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 37 हजार 364 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे कोरोनाग्रस्त बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासात सर्वाधिक 51 हजार 255 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button