breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कोरोनाचा उद्रेक : पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये १३ जुलैपासून १५ दिवस कडक लॉकडाउन!

पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.त्यामुळे आता औरंगाबाद,जालना नंतर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे…उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर पुणे जिल्ह्यात 13 जुलैपासून लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये 5 जुलै आणि 9 जुलै ला जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी आणि महापौरांनी केलं होत..मात्र पिंपरी चिंचवडकरांनी त्यालाही केराची टोपली दाखवली..त्यामुळे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रसारामुळे अखेर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात वाढत्या रूग्णांची संख्या लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यात बैठक घेण्यात आली. दरम्यान पालकमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना वाढत्या कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांबाबत विचारपूस केली. यावेळी सर्वानुमते सोमवार(ता.१३) पासुन पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन करण्याची सांगण्यात आले. याबाबत अधिकृत घोषणा पालकमंत्री अजीत पवार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार  असल्याचे अधिकृत सुत्राकडून सांगण्यात आले.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button