breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंदियाचे नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्य पर्यटनासाठी खुले

गोंदिया – लॉकडाऊनमुळे तब्बल सात महिन्यांपासून बंद असलेल्या गोंदियाचे नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्य आज पर्यटनासाठी खुले करण्यात आले. बऱ्याच विश्रांतीनंतर हे अभयारण्य सुरु झाल्याने पर्यटक उत्साही होते, या अभयारण्यामध्ये खासगी वाहनांना प्रवेश दिल्याने जिप्सी चालकांची मात्र निराशा झाली आहे. मात्र ऑफलाईन प्रवेश न मिळाल्याने अनेक पर्यटकांना आल्या पावली माघारी जावे लागले.

पर्यटकांना जंगल सफारी करायची असेल तर त्यांना अगोदरच ऑनलाईन बुकिंग करावे लागते. बुकिंग केलेलं असेल तरच ते पर्यटक जंगल सफारी करू शकतात. जंगल सफारी करताना खासगी वाहनांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. मात्र आज पहिल्याच दिवशी सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक खासगी वाहनांना प्रवेश देण्यात आला, त्यामुळे येथील अधिकऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथून २२ किलोमीटर पिटेझरी गेटवरुन या अभयारण्यात प्रवेश करता येतो. तिरोडा येथून १२ किलोमीटर अंतरावरुन या अभयारण्यात प्रवेश करता येते. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता वाहनाच्या एकूण पर्यटक क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांना वाहनात प्रवेश दिला जाणार आहे, १० वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पयर्यटनाकरिता प्रवेश दिला जाणार नाही, सर्व पर्यटक, गाईड व वाहन चालक यांना मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button