breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या सर्वेक्षणातून ढिसाळ कारभाराचे दर्शन; महापौर माई ढोरे यांनी यांची प्रशासनावर टीका

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील करोना संशयितांचे सुरू असलेले सर्वेक्षण अत्यंत ढिसाळ असल्याची टीका महापौर माई ढोरे यांनी केली आहे. अधिकार्‍यांमध्ये नसलेला समन्वय आणि गांभिर्याच्या अभावामुळेच हा प्रकार घडत असल्याचेही त्या म्हणाल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील करोना बाधित तसेच संशयितांचे व ज्या परिसरात करोनाचे रुग्ण सापडले आहेत त्या परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षक, पालिकेचे कर्मचार्‍यांकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र पालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याच्या मुद्यावर महापौरांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी बोलताना महापौर ढोरे म्हणाल्या, शहरात सध्या करोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही वैद्यकीय विभाग आणि आरोग्य विभाग सर्वेक्षणाची चुकीची आकडेवारी जाहीर करत आहेत. अधिकार्‍यांमध्ये समन्वय व गांभिर्य नसल्यामुळेच असे घडत आहे. ढिसाळ कारभारात सुधारणा होण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button