breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीला भावपूर्ण वातावरणात निरोप

पुणे (महा ई न्यूज) –  गणेशोत्सवाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील वैभवशाली मानाच्या पाच गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली. दरम्यान, मिरवणुकीसमोर पारंपरिक खेळाचे सादरीकरण करण्यात येत आले. शहरात देशातूनच नाही तर विदेशातून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला गणेशभक्त आले आहेत.

पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. मानाच्या पाचही गणपतीची मिरवणूक पूर्ण दिवसभर ८ तास ३५ मिनिटानंतर संपली. शेवटच्या मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपतीचे विसर्जन ७ वाजून ६ मिनिटांनी झाले.

मानाचा पहिला गणपती: कसबा गणपती 

पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचे विसर्जन तब्बल सहा तासाने पतंगा घाटावर झाले.  महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात 4 वाजून 03 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.

पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आरती करून मंडई पासून मनाच्या गणपतीची मिरवणूक सुरु झाली. रांगोळ्याच्या पायघड्या, ढोल ताशा पथकाच्या गजरात ही मिरवणूक 2 वाजून 50 मिनिटांनी टीळक चौकात पोहचली, यावेळी महापौर मुक्ता टीळक यांनी स्वागत केले.

मानाचा दुसरा गणपती:  तांबडी जोगेश्वरी गणपती

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणून स्थान असलेला तांबडी जोगेश्वरी गणपतीचे आज सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.  महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.  2 वाजून 50 मिनिटांनी बाप्पाची मिरवणूक टीळक चौकात पोहचली, यावेळी महापौर मुक्ता टीळक यांनी स्वागत केले.

मानाचा तिसरा गणपती: गुरुजी तालीम

मानाच्या तिसऱ्या गणपतीचे सायंकाळी ५ वाजून ३३ मिनिटांनी कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करण्यात आले आहे. आज सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर तब्ब्ल ७ तासांनंतर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

मानाचा चौथा गणपती: तुळशी बाग

मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीस सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी उत्साहात सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या रथात गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान झाल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली. तसेच मिरवणुकीसमोर पारंपरिक खेळाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला ६ वाजून २६ मिनिटांनी निरोप दिला.

मानाचा पाचवा गणपती : केसरी वाडा गणपती 

मानाच्या पाचही गणपतीची मिरवणूक पूर्ण दिवसभर ८ तास ३५ मिनिटानंतर संपली. शेवटच्या मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपतीचे विसर्जन ७ वाजून ६ मिनिटांनी झाले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button