breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत अवघ्या दोन मिनिटात रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा

पिंपरी – पिंपरीत मातृभूमी ढोल पथकाचे प्रत्यक्षीक सुरू असतानाच अचानक विरूध्द दिशेने रुग्णवाहिका आल्याने अवघ्या दोन मिनीटातच ढोल पथकाच्या कलाकारांनी मार्ग मोकळा करून दिला. अशा सार्वजनिक उत्सवातही गणेश भक्तांकडून मानवतेचे दर्शन घडले.

पिंपरी मधील श्री नवचैतन्य मंडळाची मिरवणूक मुख्य बाजारातील शगुन चौकात आली. मंडळाच्या ढोल-ताशा पथकाने कला सादर करण्यास सुरुवात केली. इतक्यात अचानक डीलक्स चौकाकडून रुग्णवाहिका आली असता मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. ढोल ताशाच्या गजरात सुरू असलेल्या मिरवणुकीतही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दक्षता घेतली. रुग्णवाहिका निघून जाताच पुन्हा ढोलताशा पथकातील कलाकारांनी ताल धरला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button