breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात शिवाजीनगर ते लोणावळा ‘लोकल’ वाढणार

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून शिवाजीनगर ते लोणावळा स्थानकादरम्यान लोकलसाठी एक स्वतंत्र लोहमार्ग निर्माण केला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन सामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते नुकतेच झाले. हा मार्ग येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून, यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढून त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर विविध कामांचे आणि सुविधांचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 22) करण्यात आले. त्यात शिवाजीनगर ते लोणावळा नवीन लोहमार्गाचे भूमिपूजन, प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण आणि प्रवाशांसाठी प्रतीक्षागृहाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, उपव्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा उपस्थित होते.

प्रवाशांच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शिवाजीनगर ते लोणावळा लोकलची संख्या वाढविण्यासाठी सध्याच्या मार्गावर काही मर्यादा येत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून शिवाजीनगर ते लोणावळा रेल्वेस्थानकादरम्यान लोकल गाड्यांसाठी नवीन लोहमार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button