breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विमानतळावर नवीन ‘फूड कोर्ट’

पुणे | महाईन्यूज

मागील पाच महिन्यांपासून पुणे विमानतळ टर्मिनल इमारतीमधील बंद पडलेले ‘फूड कोर्ट’ पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) पावले उचललेली आहेत. त्यासाठी मंगळवार (दि. ११) पासून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पुढील दीड-दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करून नवीन फूड कोर्ट सुरू केले जाणार आहे.

विमानतळ टर्मिनल इमारतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये फुड कोर्ट सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये मल्टी ब्रँडेड रेस्टॉरन्टचा समावेश होता. त्यामध्ये जेवणाची सुविधाही उपलब्ध होती. त्यामुळे प्रवाशांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळत असल्याने त्याला मागणीही होती. पण काही कारणांमुळे सप्टेंबर २०१९ मध्ये ते बंद करण्यात आले. याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. फूड कोर्ट लवकर सुरू करण्याची मागणीही त्यांच्याकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर पुणे विमानतळ संचालक कुलदीप सिंग म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील दीड ते दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. विमानतळावर येणारे प्रवासी कोणत्याही वेळेत येत असतात. त्यामुळे त्यांना विमानतळावर खानपानची चांगली सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. ही सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button