breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेत 24 तासात 70 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण वाढले

वॉशिंग्टन : जगात अमेरिका हा देश कोरोना संकटाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे 70 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोणत्या देशात 24 तासात झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 31,83,856 लोकं कोरोनाग्रस्त झाले आहेत.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की जगभरात आतापर्यंत 1,24,61,962 लोकांना प्राणघातक कोरोनाची लागण झाली आहे. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत जगात 5,59,481 लोकांनी प्राण गमावले आहेत. तर आतापर्यंत 68,35,987 रुग्ण बरे झाले आहेत.

ब्रिटनमधील आता वेगवेगळ्या देशांमधून येणाऱ्या लोकांना दोन आठवडे क्वारंटाईन राहावं लागणार नाही. शुक्रवारपासून प्रवाशांना हा दिलासा मिळाला आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, 75 देश आणि ब्रिटिश परदेशी भागातून आलेल्या लोकांसाठी नियम शिथिल केले जात आहेत. शुक्रवारी सकाळपासून फ्रान्स, इटली, बेल्जियम, जर्मनी आणि इतर देशांमधून ब्रिटनमध्ये येणार्‍या लोकांना यापुढे 14 दिवसांपासून अलिप्त राहण्याची गरज नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button