breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विभागातील 912 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 3 हजार 23 रुग्ण

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

पुणे विभागातील 912 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 23 झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 948 आहेत. विभागात कोरोना बाधीत एकुण 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 92 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

          विभागात 3 हजार 23 बाधित रुग्ण असून 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 2 हजार 657 बाधीत रुग्ण असून 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 827 कोरोना बाधीत  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 684 आहे. तर 85 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.   

          सातारा जिल्हयात 115 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 20 कोरोना बाधीत  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 93 आहे.

          सोलापूर जिल्हयात 196 बाधीत रुग्ण असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 29 कोरोना बाधीत  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 154 आहे.

          सांगली जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 27 कोरोना बाधीत  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे.

          कोल्हापूर  जिल्हयात 18 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 9 कोरोना बाधीत  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे.

          आजपर्यत विभागात एकुण  30 हजार 618 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 29 हजार 610 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 374 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 26 हजार 244 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह  आला असून 3 हजार 23 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

          आजपर्यंत विभागात 88 लाख 49 हजार 655 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 81 लाख 47 हजार 952 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 159 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button