breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे महामेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडचा समावेश करा, नगरसेवक मयूर कलाटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महामेट्रोचे केवळ ‘पुणे महामेट्रो’ असे नाव कायम न ठेवता ‘पुणे, पिंपरी-चिंचवड महामेट्रो’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या वर्षभरात पिंपरी ते शिवाजीनगर, स्वारगेटपर्यंत मेट्रो चालू होईल. या मेट्रोचे नामकरण पुणे महामेट्रो असे करण्यात आले आहे. या नावत पिंपरी-चिंचवड वगळल्याने शहरातील नगरसेवक, राजकीय पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामधून शिवाजीनगर, स्वारगेट येथे मेट्रो जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराने औद्योगिकरण, आयटी क्षेत्रात सर्वात वेगाने विकसित होणा-या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून जाणा-या मेट्रोचे पुणे महामेट्रो असे न करता पुणे – पिंपरी-चिंचवड महामेट्रो असे नामकरण करणे क्रमप्राप्त आहे, अशी मागणी नगरसेवक मयूर कलाटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button