breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र

  • 1.43 कोटी रोकड, 20 एकर जमीन, इमारती जप्त 

नवी दिल्ली – सुरक्षा दलांनी माओवादी नक्षलवाद्यांच्या विरोधातील देशभरातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. या कारवाई अंतर्गत नक्षलवादी म्होरक्‍यांनी चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशांतून जमा केलेली विविध प्रकारची मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यामध्ये 1.43 कोटी रूपयांची रोकड, 20 एकर जमीन आणि काही इमारतींचा समावेश आहे.
मागील काही दिवसांत बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (यूूएपीए) अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली.

प्रामुख्याने बिहार आणि झारखंडमधील नक्षलवादी म्होरक्‍यांच्या रोकड, जमीन, इमारती, कार, बस, ट्रॅक्‍टर्स, एक्‍सकॅव्हेटर आदी मालमत्तेवर टाच आणली गेली, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली. याशिवाय, बिहारमधील एका नक्षलवादी म्होरक्‍याने पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकत्यात खरेदी केलेले दोन फ्लॅटही जप्त करण्यात आले आहेत. नक्षलवादी म्होरक्‍या दिवगंत अरविंदजी याची पत्नी प्रभावतीकडून बिहारच्या जेहानाबादमध्ये 27 लाख तर आणखी एक म्होरक्‍या नंदू यादव याचा मुलगा रोहित याच्याकडून झारखंडच्या लातेहारमध्ये 25 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली.

यमुना मिस्त्री, अर्जुन सिंह, सुनील सिंह आणि संतोष झार या नक्षलवादी म्होरक्‍यांचीही मालमत्ता हस्तगत करण्यात आली. प्रामुख्याने व्यावसायिकांकडूून खंडण्या उकळून त्यांनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट झाले आहे. नक्षलवाद्यांचे आणि विशेषत: त्यांच्या म्होरक्‍यांचे आर्थिक स्त्रोत रोखण्याची कारवाई करण्याच्या उद्देशातून गृह मंत्रालयाने नुकत्याच एका गटाची स्थापना केली आहे. याशिवाय, नक्षलवादाशी संबंधित महत्वाच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेत (एनआयए) स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची प्रक्रियाही गृह मंत्रालयाने सुरू केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button