breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेच्या महापाैरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड

पुणे |महाईन्यूज|

पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची बहुमताने निवड झाली. या निवडणुकीत मोहोळ यांना ९७ मते मिळाली. तर, राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेनेचे प्रकाश क़दम यांना ५९ मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेने, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. तर, मनसे तटस्थ राहिली. महापालिकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली.

निवडणूक प्रक्रिया सुरू होताच, उमेदवारी अर्ज मागे घेण्यास १५ मिनिटांचा वेळ दिला. त्यात कोणीही माघार घेतली नाही. त्यानंतर मतदान झाले. महापालिकेत भाजपचे ९९, राष्ट्रवादीचे ४१. कॉंग्रेसचे १० नगरसेवक आहेत. तर, शिवसेनेकडे १०, मनसे २ तर, एमआयएमचा १ असे १६३ नगरसेवक आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी ‘व्हिप’ काढला होता. महापौरपद खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित होते. त्यासाठी पक्षाने मोहोळ यांना संधी देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button