breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘अनाथ’ नागरिकास पिंपरी चिंचवड पालिकेकडून सदनिकेची दिली चावी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहरातील ‘अनाथ’ असलेल्या नागरिकास महापालिकेकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातंर्गत सदनिकेची चावी आज (शुक्रवारी) नुतन महापाैर माई ढोरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.

महापालिकेच्या महापाैर दालनात आज हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नुतन उपमहापाैर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डिकर, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक नामदेव ढाके, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, हर्षल ढोरे, नगरसदस्या शारदा सोनवणे, अनुराधा गोरखे, माजी नगरसदस्य भीमा बोबडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत अनाथ पती किंवा पत्नी यांना सदनिका वाटप करण्यास महासभेने मान्यता दिली. त्यानुसार सुजीतकुमार नाईक या अनाथ व्यक्तीने कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना सदनिकेची चावी देऊन सदनिकेचा ताबा देण्यात आला.

मनपा हद्दीतील अनाथ पती किंवा पत्नी यांना BSUP अंतर्गत सदनिका वाटप करण्याचा ठराव महापालिका सभेने दि. ०६/०६/२०१९ रोजी केला होता. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मनपा हद्दीतील अनाथ पती किंवा पत्नी यांना BSUP अंतर्गत एकूण सदनिका संख्येच्या १ % सदनिका राखीव ठेवण्याचे आदेश निर्गमित केले होते. या अंतर्गत सुजितकुमार नाईक यांनी कागदपत्राची पूर्तता केल्याने अजंठानगर या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या अशोका सोसायटीतील इमारत क्र. १३ मधील सदनिका क्र. ५१३ चा ताबा आज देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button